महाराष्ट्रसामाजीक
अजय बिवडे यांना ‘अजेय लेखणी सन्मान पुरस्कार-२०२६’ जाहीर
आर्यारवी एन्टरटेन्मेंटतर्फे १२ जुलै रोजी मुंबईत होणार पुरस्कार वितरण

नागपूर, प्रतिनिधी :-
नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या सिंहवाणी वृत्त या दैनिकाचे मुख्य संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अजय बिवडे यांची प्रतिष्ठेच्या ‘अजेय लेखणी सन्मान पुरस्कार-२०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, सामाजिक बांधिलकी आणि संपादकीय नेतृत्वाची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या अजय बिवडे यांनी विविध वृत्तपत्रे व माध्यमांमध्ये प्रभावी कार्य केले आहे. ते भारत सरकारमान्य पीआरजीआय प्रेस असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असून, दैनिक शिवघोषचे संपादक म्हणूनही कार्यरत आहेत.



