क्राईम

प्रल्हाद मंडलचा घातपात, चौकशी करा गावकऱ्यांची मागणी

आमदार डॉ देवराव होळी यांना दिले निवेदन 

चामोर्शी, प्रतिनिधी :-

१८ ऑगस्ट २०२४ रोजी प्रल्हाद प्रदीप मंडल व प्रणव उत्तम मंडल गडचिरोली वरून चामोर्शी कडे येत असताना तळोधी मोकासा जवळील वळणावर अपघात होऊन प्रल्हाद मंडल यांचा जागीच मृत्यू झाला परंतु घटनास्थळावरून मृतदेह न मिळता मृतदेह दुसरीकडे आढळून आला त्यामुळे सदर प्रकरण संशयास्पद असून प्रल्हाद मंडल यांचा घातपाताने खून करून अपघाताचा देखावा करण्यात आला आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून न्याय मिळवून द्यावा व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मृतकाची आई पुष्पा प्रदीप मंडल व पत्नी प्रिया प्रल्हाद मंडल, व सर्व गावकऱ्यांनी यांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे केली आहे.

या प्रकरणामध्ये प्रल्हाद प्रदीप मंडल व प्रणव उत्तम मंडल यांच्यात आर्थिक व्यवहारावरून मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे या घटनेपूर्वी त्यांच्यामध्ये नक्की काय झाले हे तपासण्याची आवश्यकता आहे सदर प्रकरणाची चौकशी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून डॉग स्कॉड तसेच वापरण्यात आलेल्या यंत्रणेने देखील चुकीच्या पद्धतीने चौकशी केलेली आहे. त्यामूळे सदर प्रकरणाची चौकशी योग्य अधिकाऱ्यामार्फत झाल्यास हा अपघात नसून घातपात होता हे सिद्ध होईल.

तरी सदर प्रकरणाची सक्षम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार देवराव होळी यांचे कडे निवेदनाच्या माध्यमातून मृतकाची आई,पत्नी सह गावकऱ्यांनी केली आहे. आमदार देवराव होळी यांनी मंडल परिवाराचे सांत्वन करीत आपल्याला नक्कीच न्याय मिळेल असे आश्वासन दिले.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker