ताज्या घडामोडीदेश विदेश

“इस्रोमॅन” रामेश्वर हालगे यांना आदर्श युवा पुरस्कार प्रदान

जवळा बाजार, प्रतिनिधी :-

 येथील उत्तुंगतेज फाऊंडेशन चे संस्थापक रामेश्वर केशव हालगे यांनी महाराष्ट्रभर जवळपास ६०० शाळांतील हजारो विद्यार्थ्यांमध्ये ‘मला शास्त्रज्ञ व्हायचं’ या चळवळीतून विज्ञान प्रसाराचे कार्य केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर येथे पहाट फाउंडेशन चा मानाचा व प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘आदर्श युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभुषण पुरस्कार प्राप्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार,डॉ. जीवन राजपुत(जे.जे. प्लस हॉस्पिटल), प्रसिध्द कवी दंगलकार नितीन चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजकार्यात आवड असल्याने स्वतःला समाजकार्यात झोकून घेतलेले रामेश्वर हालगे हे एक युवकांसाठी आदर्शच आहेत.त्यांनी २०२० मध्ये उत्तुंगतेज फाऊंडेशन ची स्थापना करून विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यात ऊसतोड कामगारांसोबत दरवर्षी दिवाळी साजरी, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक, २०२१ मध्ये देशात शास्त्रज्ञांची पिढी निर्माण व्हावी यासाठी सुरू केलेली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी’ मला शास्त्रज्ञ व्हायचं’ ही विज्ञान चळवळ, यातून महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी शास्त्रज्ञ बनण्याची स्वप्न बघत आहेत.

 या चळवळी दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास ६०० हून अधिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान प्रसाराचे काम रामेश्वर हालगे यांनी केले.

या चळवळीचा एक भाग म्हणून मराठवाड्यातील पहिले बालविज्ञान संस्कार केंद्र उत्तुंगतेज फाऊंडेशन च्या माध्यमातून सुरू केले. सध्या ‘एक घर एक प्रयोगशाळा’ हा अनोख्या उपक्रम चालू आहे.दरवर्षी ६० विद्यार्थ्यांना इस्रो आयआयटी यासारख्या संस्थांना विद्यार्थ्यांना मोफत अभ्यास दौऱ्यासाठी नेले जाते आता पर्यंत त्यांनी ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना इस्रो चा अभ्यास दौरा घडवून आणला म्हणून त्यांची राज्यभर इस्रोमॅन अशी ओळख निर्माण झाली आहे.

हा पुरस्कार सोहळा संभाजीनगर येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात पार पडला.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.