क्राईम

आंबेशिवणी येथून वाघ शिकार महिलेसह ११ जणांना अटक

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

वाघाच्या शिकार प्रकरण चे धागेदोरे हे थेट गडचिरोली शहराजवळ असलेल्या आंबेशिवणी येथे असल्याने जिल्ह्या पर्यंत पोहचले असून येथून ११ जणांना अटक करण्यात आली असून हे शिकार प्रकरण राष्ट्रीय पातळीअसल्याचे उघडकीस आले आहे.

आसाम राज्यातील गुवाहाटी, पोलिस विभाग व वनविभाग आसाम यांच्या संयुक्त कारवाईत वाघाचे शिकार प्रकरणी हरयाणातील बावरीया जमातीच्या तीन व्यक्तींना वाघाची कातडी व हाडांसह अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचे पाळेमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याले आहे. या प्रकरणात गडचिरोलीजवळील आंबेशिवणी येथून ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

या शिकाऱ्यांनी चंद्रपूर व गडचिरोली या परिसरात शिकार केली काय ? या बाबत चौकशी  करण्याकरिता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी तीन सदस्यीय पथक गुवाहाटी येथे रवाना केले होते. सदर पथकाने गुवाहाटी येथे कारागृहात असलेल्या आरोपींची चौकशी केली असता सदर शिकारी टोळीमधील काही महत्त्वाचे सदस्य गडचिरोली वनविभागाचे क्षेत्रात वावरत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर वनवृत्त व गडचिरोली वनवृत्ताची एक संयुक्त चमू गठित करण्यात आली.

या चमूद्वारे २२ जुलैला रात्री २ वाजता गडचिरोलीजवळ आंबेशिवणी येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित ठिकाणी छापा टाकला. या कारवाई दरम्यान राहत्या झोपड्यांमध्ये वाघांच्या शिकारीकरिता वापरण्यात येणारे सहा फासे, धारदार शस्त्रे, वाघांची तीन नखे व ४६ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. यात सहा पुरुष, पाच महिला यांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.