क्राईम

आरमोरी घटना आरोपीस अटक व पोलीस कोठडी 

उद्या आरमोरी बंद

गडचिरोली, प्रतिनिधी :-

दिनांक १५/०८/२०२४ रोजी बर्डी आरमोरी ता.आरमोरी येथील शिवम कॅफे येथे मोबाईल चार्जर दिला नाही या कारणावरून एका तरुणीस बेदम मारहाण करण्यात आली होती. यातील दोन्ही आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

            या घटनेनंतर दिनांक १७/०८/२०२४ रोजी प्रियंका सुकेंदू रॉय वय १९ वर्ष हिने दिलेल्या पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरुन पो.स्टे आरोमारी येथे गुरक्र २१८/२४ कलम ७४,७९,११५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

उद्या आरमोरी बंद

युवतीला मारहाण करणाऱ्या आरोपीच्या विरोधात सर्व स्तरावरून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या विरोधात दिनांक २० आगस्ट ला आरमोरी बंद चा इशारा भाजपचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी दिला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी नामे १) सोहेल मेहमूद शेख २) अब्दुल अयुब नासिर शेख हे फरार झाले होते. गडचिरोली पोलिस दलाने सदर दोन्ही फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना आज दिनांक १९/०८/२०२४ रोजी सकाळी अटक केली.अटकेनंतर दोन्ही आरोपितांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने दोन्ही आरोपितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker