आपला जिल्हा

कलावंत असलो तरी मला सुर गवसला नाही.- पद्मश्री डॉ.परशुराम खुणे पद्मश्री

गडचिरोलीत गित गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

गडचिरोली, प्रतिनिधी :-

झाडिपट्टीच्या रंगभूमीला राज्यात फारसं महत्त्व दिलं जात नाही त्याला विविध कारणं आहेत. तरीही मला या झाडीपट्टीच्या रंगभूमीने आकाशाला गवसणी घालून जिल्ह्याचे नाव लौकीक देशात करण्याची संधी दिली. मला वडील,काका, भाऊ यांचे कडुन पिढी जात कलावंताचा वारसा लाभला असला तरीही मला सुरू कधीच गवसला नाही अशी खंत पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांनी व्यक्त केली.

गडचिरोली येथे कात्रटवार सभागृहात झाडीपट्टी कलावंत तालुका संघटना गडचिरोली च्या वतीने विदर्भस्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते ऊद्घाटकीय स्थानावरुन बोलत होते. या स्पर्धेला पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर नागपूर यवतमाळ भंडारा गोंदिया या जिल्ह्यातील एकूण ४६ स्पर्धकांनी प्रवेशिका सादर केल्या परंतु पूर परिस्थिती असल्याने ४० स्पर्धकांनी उपस्थित होऊन प्रत्यक्ष गीत गायन स्पर्धेत आपले गायन कौशल्य दाखविले.

याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी वामनराव सावसाकडे से.नि.विस्तार अधिकारी, प्रा.राजेशभाऊ कात्रटवार, प्रविण भाऊ मुक्तावरम, अध्यक्ष जितेंद्र उपाध्याय, उपाध्यक्ष सुनिल चडगुलवार, कार्याध्यक्ष सिद्धार्थ गोवर्धन, राजेंद्र बोबाटे सचिव, निर्माता देवाशेडमाके दिलीप मेश्राम दादाजी चुधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात वामनराव सावसाकडे यांनी सांगितले की, गडचिरोली शहरात नवोदित नाट्य कलावंत ,गायक यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकपात्री अभिनय स्पर्धा , गित गायन स्पर्धा आयोजित करून सुनिल चडगुलवार, प्रविण मुक्तावरम, जितेंद्र उपाध्याय, सिद्धार्थ गोवर्धन, राजेंद्र बोबाटे व मित्र परिवार यांनी कलावंतांना मंच उपलब्ध करून देण्याचे कार्य करुन ख-या अर्थाने झाडिपट्टीची सेवा सुरू केलेली असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी संघटनेचे वतीने पद्मश्री डॉ . परशुराम खुणे, झाडीपट्टी जेष्ठ नाटय कलावंत सुनिल चडगुलवार, दादाजी चुधरी, नाटककार चुडाराम बल्हारपुरे व जेष्ठ निर्माता आबाजी समर्थ टेंभा यांचा शाल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक शाम शिंदे (यवतमाळ) द्वितीय क्रमांक अपर्णा दराडे, (गडचिरोली) ,तृतीय क्रमांक कार्तिक मसराम (कुरखेडा) तर प्रोत्साहन पर बक्षीस योगेश्वरी देऊरमले,(ऊधळपेठ,मुल) राजु ठाकुर,हर्ष घ्यार, (गडचिरोली)यांनी पटकाविले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून संगीत शिक्षक संजय धात्रक, दिवाकर बारसागडे, केवल बगमारे यांनी काम पाहिले. तर हार्मोनियम बाबा नक्षिणे व तबलावादक संदेश नक्षीणे यांनी साथ दिली .                        कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल चडगुलवार यांनी केले तर संचालन सिद्धार्थ गोवर्धन, आयेशा अली,दिलीप मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन विवेक मुन यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रकाश लाडे, वसंत चापले, भगवान गेडाम, राज मराठे,विवेक डांगट,वर्षा गुरुनुले, रुमाजी भुरले, तुळशिराम ऊंदिरवाडे, हेमंत कावळे, राजेंद्र चिलगेलवार इत्यादींनी परिश्रम घेतले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.