आपला जिल्हा

मुल ते चामोर्शी रेल्वे मार्ग निर्माण करा प्रा.श्रीमंत संतोष सुरपाम यांची मागणी

गडचिरोली,प्रतिनिधी :-

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील तीर्थक्षेत्र मार्कंडा देवाचा विकास व भाविक भक्तांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मुल ते चामोर्शी रेल्वेमार्ग निर्माण करण्याची मागणी प्रा. संतोष सुरपाम यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत पंतप्रधान यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

मुल ते चामोर्शी हा रेल्वेमार्ग फक्त २६ किमी आहे  . त्यासोबत चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोहप्रकल्प प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने हा रेल्वेमार्ग निर्माण झाल्यास दुहेरी फायद्याचे आहे. म्हणून आपण ह्या सर्व बाबीचा सारासार विचार करून हे रेल्वे मार्ग निर्माण करण्यास पुढाकार घ्यावा अशी विनंती निवेदनातून केली आहे.

या अगोदर महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव पि.सी.मयेकर यांनी 2011 ला भारतीय रेल मंत्रालयातील रेल्वे सचिव हे मार्ग तयार करण्याचे पत्र पाठविले होते परंतु गेल्या 13 वर्षापासुन या रेल्वे मार्ग च्या निर्माण करण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे हे विशेष.

 

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker