चामोर्शी,प्रतिनिधी :-
स्थानिक केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थ्यांनी वर्ष 2022- 23 मध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या विविध खेळांच्या संघात सहभागी होऊन आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने विद्यापीठास नावलौकिक मिळवून दिला.
ओडिषा भुवनेश्वर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय योगासन स्पर्धेत -भूषण नंदगीरवार राजस्थान येथील जगन्नाथ विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय रस्सा खेच स्पर्धेत -सचिन रोहनकर ,मध्य प्रदेश सागर येथे संपन्न झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेत-अर्चना सातारकर,मध्य प्रदेश येथे संपन्न झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत -साहिल बनसोड ,राजस्थान जयपुर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मिनी गोल्फ स्पर्धेत -सचिन रोहनकर व सुदेशना भैसारे व राजस्थान जयपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय वुडबॉल स्पर्धेत -भाग्यश्री मडावी इत्यादी खेळाडूंचा सहभाग कौतुकास्पद राहिला.
तसेच पांढरकवडा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत- निखिल दुधबळे व हरियाणा कुरुक्षेत्र येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय रस्सा स्पर्धेत -सचिन रोहनकर याचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले.
अखिल भारतीय, पश्चिम विभागीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्तरावरील वर्ष 2022 -23 मधील महाविद्यालयातील खेळाडूंचा प्रदर्शनावर क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.महेश जोशी यांनी समाधान व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीवर यशोदीप संस्था गडचिरोलीचे अध्यक्ष अरुण हरडे सचिव डॉ.स्नेहा हरडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हिराजी बनपूरकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.पवन नाईक,प्रा.गणेश दांडेकर,प्रा.महादेव सदावर्ते व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia