आपला जिल्हानिवडणूक

काँग्रेस मध्ये बाहेरून आलेले पक्ष चालवतात,निष्ठावानांचा आरोप

उदय धकाते

गडचिरोली : –

लोकसभा असो की विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात विरोधात प्रचार करणारे आज काँग्रेस पक्ष चालवत असून यांनी काँग्रेस पक्षातील हाय कमांडची दिशाभूल करून जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संपवून टाकणार काय असा प्रश्न निष्ठावान काँग्रेस नेत्यांना व कार्यकर्तेना पडला आहे.

काँग्रेस मध्ये विरोधी पक्षातून आलेले अनेक धन्याढ नेते व कार्यकर्ते हे काँग्रेस मध्ये धनाच्या भरवश्यावर कार्यरत आहेत. आज हेच काँग्रेस पक्ष चालवतात अश्या तोऱ्यात असतात. सदर यातील काही हे ठेकेदार आहेत.हे काँग्रेस मध्ये नसताना काँग्रेस पक्ष किती खराब आहेत हे मतदारांना पोटतिडकीने सांगत होते. त्यांच्या पक्षात त्यांचे वजन नसल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाचा मार्ग पकडून या जिल्ह्यात हळू हळू पक्षाचे निष्ठावान नेत्यांना व कार्यकर्ते यांना बाजूला सारून पक्षावर कब्जा केला आणि महत्वपूर्ण पद काबीज केले, काही पदावर त्यांनी आपले ऐकणारे कार्यकर्ते ना पक्षाला नियुक्ती करायला भाग पाडले.हे सर्व डोळ्यासमोर होत असतांना सुद्धा निष्ठावान हे पक्षाचे काम ग्राम पातळी पासून तर जिल्हा पातळी पर्यंत करीत होते.

मागील एक वर्षात अनेकांना अपमाणित करून पक्ष सोडण्यासाठी भाग पाडल्या गेले. यात प्रामुख्याने काँग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेस च्या विधानसभा २०१९च्या उमेदवार डॉ.चंदा कोडवते व त्यांचे पती डॉ. नितीन कोडवते व अनेकांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला.
आज जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस मध्ये प्रचंड बंडखोरी पाहावायस मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील निष्ठावान काँग्रेस नेते माजी आमदार व माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार पेंटा रामा तलांडी, माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी बंडखोरी चा झेंडा हातात घेऊन काँग्रेस हाय कमांड चे लक्ष वेधले आहे. आज हाय कमांड आपण कुठं चुकलं आहोत याचा निष्कर्ष काढला असून या तीनही माजी आमदार ची समजूत काढण्यासाठी दिवस रात्र एक करीत आहेत.

आरमोरी येथून काँग्रेस चे माजी आमदार आनंदराव गेडाम, गडचिरोली येथून ऍड. विश्वजित मारोतराव कोवासे, अहेरी येथून नीता पेंटारामा तलांडी यांनी उमेदवारी दाखल करून अधिकृत काँग्रेस उमेदवार च्या मनात धडकी भरवली आहे. या जिल्ह्यात तीनही जागेवर महायुती चे उमेदवार निवडून येण्याचे पद्धतशीर कारस्थान हे पक्षाबाहेरून आलेले नेत्यांनी केले आहे. असा आरोप काँग्रेसच्या एका माजी आमदाराने केला आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोलीत कायम हस्तक्षेप करतात. जिल्ह्यातील नेत्यांना डावलून परस्पर निर्णय घेतात. इतके वर्ष प्रामाणिकपणे पक्षात कार्य करूनही आमची कोंडी होत असेल तर वेगळा मार्ग का निवडू नये, असा सवाल उपस्थित करून आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी आपण अर्ज मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत सर्वाधिक बंडखोरी काँग्रेसमध्ये झाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. यात आरमोरी विधानसभेतून काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी बंडाचे निशाण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker