आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

कृत्रिम MRP वाढीविरोधात ग्राहक पंचायतचे उद्या धरणे आंदोलन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

दैनंदिन वापराच्या वस्तू, औषधे, बियाणे, कीटकनाशके तसेच कृषी निविष्ठांवर कृत्रिमरीत्या वाढविण्यात येणाऱ्या कमाल किरकोळ किंमती (MRP) मुळे ग्राहक व शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोली यांच्या वतीने शुक्रवार, १२ जून रोजी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनानंतर केंद्र सरकारच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे.

उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि वाजवी नफा यावर आधारित SRP (Suggested Retail Price) प्रणाली लागू करावी, उत्पादन खर्चाची माहिती सार्वजनिक करावी, QR कोडच्या माध्यमातून किंमत पारदर्शकता आणावी तसेच भ्रामक सवलती आणि अवाजवी नफेखोरी रोखण्यासाठी संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी प्रमुख मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.

याशिवाय MRP सुधारणा व किंमत नियंत्रणासंदर्भातील अभ्यास समित्यांमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याची मागणीही करण्यात येणार आहे. ग्राहक, शेतकरी व रुग्णांचे आर्थिक हित जपण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

दिल्ली येथील जंतर-मंतरवर १२ जून रोजी राष्ट्रीय स्तरावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्याच अनुषंगाने देशभरातील जिल्हा व तालुका मुख्यालयांवरही आंदोलन करण्यात येणार आहे. गडचिरोली येथे सकाळी १० वाजता कारगिल चौक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असून, त्यानंतर सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात येणार आहे.

या आंदोलनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला जिल्हाध्यक्ष उदय धकाते, प्रांत सदस्य चंद्रकांत पतरंगे, मार्गदर्शक विजय कोतपल्लीवार, उपाध्यक्ष विजय साळवे,सचिव अरुण पोगळे,महिला प्रमुख सुचिता धकाते, पर्यावरण प्रमुख डॉ. देवेंद्र मुनघाटे,एम. डी. मेश्राम,आशाताई कोकोडे,मेघाताई कोतपल्लीवार यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आंदोलनात सर्व नागरिक, समाजसेवक, पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker