आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी
गडचिरोलीत भव्य सांस्कृतिक महोत्सव आमदार डॉ. मिलिंद सगुणाबाई रामजी नरोटे यांचा पुढाकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त

गडचिरोली, प्रतिनिधी :-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा महोत्सव–२०२६’ अंतर्गत गडचिरोली येथे भव्य ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद सगुणाबाई रामजी नरोटे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आरमोरी रोडवरील सुमानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
‘अजब गजब विचार मंच’ प्रस्तुत या सांस्कृतिक महोत्सवात पुण्याचे सुप्रसिद्ध गायक राजेश दातार व प्रज्ञा देशपांडे यांचा सुरेल गीतांचा कार्यक्रम रंगणार आहे. याशिवाय मुंबईतील नामांकित कलावंतांकडून गोंधळ, भारूड, कोळीगीत, जोगवा, धार्मिक व देशभक्तिपर गीत-नृत्य, तसेच महापुरुषांच्या जीवनगाथेवर आधारित विशेष नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहेत. संगीत, नृत्य आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा संगम असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
या सांस्कृतिक महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे नि:शुल्क असून नागरिकांच्या सोयीसाठी प्रवेश पासची व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुकांनी वेळेत पासेस प्राप्त करून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
‘अजब गजब विचार मंच’चे संस्थापक सतीश त्रिनगरीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.



