आपला जिल्हाताज्या घडामोडी
अमेय सावकार पोरेड्डीवार यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली शहराचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे सुपुत्र अमेय सुरेश सावकार पोरेड्डीवार (वय ३७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेय सावकार पोरेड्डीवार यांच्यावर उद्या सकाळी १०.३० वाजता गडचिरोली येथील कठाणी नदीवरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यापूर्वी त्यांच्या निवासस्थान असलेल्या सावकार वाड्यातून सकाळी १० वाजता अंतिमयात्रा निघणार आहे.



