गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार आणि राज्याचे माजी राज्यमंत्री स्व. बाबुरावजी मडावी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासी परधान समाज मंदिर, गडचिरोली येथे विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याच्या विकासाचा पाया रचणाऱ्या या थोर लोकनेत्याच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व. बाबुरावजी मडावी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आदिवासी परधान समाज मंडळाचे अध्यक्ष प्रदिप मडावी, युवा सदस्य महेंद्र मसराम, रुपेश सलामे, विजय सुरपाम, आदिवासी विकास युवा परिषदचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, आकाश कुळमेथे, बादल मडावी कार्याध्यक्ष आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोली, अनिकेत बांबोळे, अंकुश बारसागडे, गणेश धोटे, विनोद सुरपाम, गणेश मेश्राम, राज डोंगरे, अंकित कुळमेथे, पंकज नैताम, महादेव कांबळे आणि सुरज गेडाम उपस्थित होते.
यावेळी वक्ते आणि उपस्थितांनी स्व. बाबुरावजी मडावी यांच्या गौरवशाली कार्याचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button