गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोलीच्या जंगलात आता नक्षलवादी च्या बंदूक चालणार नाहीत तर दारू तस्करच्या बंदूकची दहशत चालणार आहे. हा प्रकार आज उघडकीस येताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील पोलीस स्टेशन रेपनपल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली, अंतर्गत येत असलेल्या मौजा छल्लेवाडा येथील कुख्यात दारू तस्कर गुलाब देवगडे याने एका युवकाला मल्लमपल्लीच्या जगलात नेवून बेदम मारहाण केली. त्यानंतर दररोज १०-१२ युवकांना त्याच्या राहते घरी बोलेरो वाहनाने येवून धारदार शस्त्र-अस्त्र, पिस्तुल घेवून जीवे मारण्याची वारंवार धमकी देत असल्याबाबतचा गंभीर घटना उघडकीस आली असून पोलीस प्रशासन हे बघ्याची भूमिका घेत आहेत. अमोल बाजीराव म्हेसकर या युवकाने आज गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन (गामा) च्या मंचावर पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावरील आपबिती सांगितली.
मौजा आलापल्ली येथील रहिवासी असून त्याचा व्यवसाय मजुरीचा आहे. मजुरी करीत असतांना त्याची भेट गैरअर्जदार कुख्यात दारू तस्कर गुलाब देवगडे यांचेvसोबत झाली. आणि गुलाबने मला रोजगार देतो म्हणून दारू तस्करीच्या धंद्यात ओढले.म्हैसकर हा बेरोजगार असल्याने त्याच्या सोबत दारू व्यवसाय करायला लागला. व दारू व्यवसायात त्याची रोजंदारी होती. त्यामुळे प्रपंच चांगला चालत होता. सदर दारू तस्करीचे काम करतांना गुलाब देवगडेनी त्याला दारू एजन्ट बनवला. व दारू विक्रेते यांचेकडून दारूचे ऑर्डर घेणेसाठी पाठवायला लागला. त्यांना अनेक आर्डर आणुन दिले. यामध्ये दारू तस्कर गुलाब देवगडे यांचा चांगलाच आर्थीक फायदा व्हायला लागला.
लाहेरी येथील अवैध दारू विक्रेता सोनु माटे यांने २०० पेटी दारूचे आर्डर दिले. सदर दारूचे आर्डर कुख्यात दारू विक्रेता गुलाब देवगडे यांना दिला. व त्यांनी सदर आर्डर स्विकारला. व २०० पेटी दारू स्वतः दारू विक्रेता सोन माटे यांना मौजा मांडरा ता. अहेरी, जि. गडचिरोली येथे दिला. व त्याची रक्कम बाकी राहीले. त्यानंतर सदर २/०८/२२०० पटी दारू चे उर्वरीत रक्कम म्हैसकर वसुलीसाठी दारू विक्रेता गुलाब देवगडे यांचे सोबत गेले असता सोन माटे नीरु दारूची उर्वरीत रक्कम देण्यास मनाई केली. व स्पष्ट शब्दात सांगीतले. मी दारूची रक्कम देणार सदर दारू संपूर्णपणे बोगस, पाणी मिश्रीत होती. या कारणावरून सोनु माटे यांनी उडवाउडवीचे देवून रक्कम दिले नाही. रक्कम न मिळाल्याने दिनांक ०६/०४/२०२५ रोजी म्हैसकर याला मल्लमपल्लीच्या जंगलात नेवून तु आडर्र “केली. आणि सांगीतले की, याबाबत पोलीस स्टेशन किंवा इतरत्र तक्रार केली तर मारून टाकीन, आणि जर का रक्कम दिली नाही तर तुझ्या कुटूंबासह मारून टाकील अशी धमकी दिली.त्याची रक्कम तुच दे म्हणून मल्लमपल्लीच्या जंगलाम डोक्याला पिस्तुल लावून बेदम मारहाण केली.
या प्रकरणात सोनु माटे यांनी बोगस दारू असल्याने दारूची उर्वरीत रक्कम गैरअर्जदार गुलाब देवगडे यांना दिली नाही. सदर रक्कम गैरअर्जदार गुलाब देवगडे हे माझ्याकडून वसुली करण्याच्या उद्देशाने माझ्या घरी दररोज बोलेरो वाहनाने १०-१२ लोकांना धारदार शस्त्र, पिस्तुल घेवुन येवुन रोज माझी आलापल्ली येथे शोध घेत आहेत. आणि या सर्व विषयामुळे माझी गैरअर्जदार केव्हा हत्या करेल काही सांगता येत नाही.
माझ्या कुटूंबाचा आधार मी आहे. माझी दोन मुले व पत्नी यांच्यासोबत जीवन जगत असतांना मी सध्या खुप दहशतीत जीवन जगत आहे. भितीमुळे माझे मानसिक संतुलन बिघडत आहे. व जीवन जगण्याची इच्छा होत नाही. कारण दारू तस्कर श्री. गुलाब देवगडे यांना श्री. सोनु माटे यांच्याकडील उर्वरीत रक्कम न मिळाल्याने सदर रक्कम माझ्याकडून धाक दाखवुन मला मारून पैसे उखळण्याच्या प्रयत्नात आहे. आणि मी त्याच्या भितीने बाहेर जावुन मजुरी करून माझ्या कुटूबाचे पोट भरू शकत नाही. अशी आपबीती म्हैसकर याने पत्रकार परिषदेत सांगितली.
गैरअर्जदार मला मारून टाकेल याची ग्वाही देत असल्याने माझ्या जीवनाला व माझ्या कुटूंबातील लोकांना धोका निर्माण झाला आहे. तरी सदर प्रकरणाची चौकशी करून मला योग्य मार्ग दाखवुन माझे कुटूंब व मला वाचवन्याची मागणी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
Back to top button