आपला जिल्हाताज्या घडामोडीनिवडणूक
नगरपरिषद गडचिरोलीच्या आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी शेखर आखाडे यांची निवड

गडचिरोली, प्रतिनिधी :-
नगरपरिषद गडचिरोलीच्या आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी शेखर भाऊ आखाडे यांची निवड झाल्याबद्दल शहरासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नगरपरिषदेचे आरोग्य व स्वच्छता सभापती मुक्तेश्वर काटवे यांचे काही महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाल्यामुळे हे पद मागील सुमारे पाच महिन्यांपासून रिक्त होते. अखेर या रिक्त पदावर शेखर भाऊ आखाडे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी शेखर भाऊ आखाडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की,आरोग्य व स्वच्छता सभापती म्हणून शेखर भाऊ आखाडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्वच्छता व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि नागरिकाभिमुख उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास आहे. त्यांच्या कार्यकाळात गडचिरोली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळो, हीच सदिच्छा.
राजकीय प्रवासही लक्षवेधी :-
शेखर भाऊ आखाडे यांचा राजकीय प्रवासही विशेष राहिला आहे. ते यापूर्वी शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अलीकडील नगरपरिषद निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आणि भाजपच्या उमेदवार म्हणून नगरसेवकपदी विजयी झाले. आता त्यांच्यावर आरोग्य व स्वच्छता सभापतीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शेखर भाऊ आखाडे यांच्या निवडीचे नगरपरिषदेतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



