अपघातआपला जिल्हाक्राईम
Trending

अमिर्झा गावाजवळ पिकअप वाहन पलटले

दोन जण जागीच ठार तर चार जण जखमी

अमिर्झा,प्रतिनिधी :- 

             वडसा देसाईगंज येथून अमिर्झा मार्गे गडचिरोलीकडे येत असलेले पीकअप वाहन काल

रात्रौ नऊ वाजताच्या सुमारास अमिर्झा गावाजवळ साईड घेत असतांना पलटले.या

अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी झाले.

             प्राप्त माहितीनुसार वडसा देसाईगंज येथून टाईल्स व इतर साहित्य घेऊन पीकअप वाहन

गडचिरोली कडे निघाले मात्र पूरामुळे आरमोरी गडचिरोली रस्ता बंद असल्याने अमिर्झा

मार्गे गाडी टाकावी लागली.दरम्यान काल रात्रौ नऊ वाजताच्या सुमारास येणाÚया

वाहनाला रस्ता देत असतांना पीकअप वाहन रस्त्याच्या खाली उतरले व ओली जागा

असल्याने वाहन घसरून खोलगट भागात पलटले.यात वाहनात असलेल्या दोघांचा

जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी झाले.

                     अपघाताची माहिती गडचिरोली पोलीस ठाण्याला देण्यात आली असता पोलीस

घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले व जखमींना

उपचाराकरीता गडचिरोली जिल्हा सामान्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.

अद्याप जखमी व मृतकांची नावे कळू शकली नाहीत. पुढील तपास गडचिरोली पोलीस

करीत आहेत.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker