राजकीय

शिवसेना (उ.बा.ठा.)गडचिरोली विधानसभाची बैठक संपन्न

गडचिरोली,प्रतिनिधी :-

शिवसेना (उ.बा.ठा.) गडचिरोली  विधानसभा  ची  बैठक दिंनाक १४ जुलै २०२३ रोजी आष्टी येथे पार पडली.या बैठकीत येणाऱ्या पं.स.,जि.प.,लोकसभा,विधानसभा चे निवडणुकी चे तयारी बाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच  निवडणुकीची तयारी म्हणुन विभाग (गट)प्रमुख व उप विभाग (गण) प्रमुख तसेच बुथ प्रमुखाचे नियुक्ती बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सध्या महाराष्ट्रात सुरु असलेली सत्तारुढ पक्षाचे नेत्यांची बेंबदशाही,गद्धारी व बाजारुपणा तसेच जिल्ह्यातिल राजकीय व सामाजीक परिस्थिती याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली.

बैठकीत विलास कोडापे सह संपर्कप्रमुख,वासुदेवराव सेडमाके जिल्हा प्रमुख,राजेंद्र लांजेकर जिल्हा समन्वयक,अंकीत सब्बनवार जिल्हा उप प्रमुख यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीला अंकीत सब्बनवार जिल्हा उप प्रमुख,स्नेहल बारसागडे,वैभव भोयर,सुरज डांगे,संजय चहारे,महेश कोरडे,रविदास बारई, डांगे ई.शिचसैनिक हाजर होते.

येनार्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात शिवसेना (उबाठा) सर्वच निवडणुकात अग्रेसर राहील असा विश्वास उपस्थित सर्वानी व्यक्त केला.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.