आपला जिल्हा

गडचिरोली पोलीस दलाच्या स्पर्धा परिक्षा २६४० विद्यार्थ्यांनी दिला  पेपर

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली पोलीस दलाच्या ” प्रोजेक्ट उडाण ” च्या माध्यमातून स्पर्धा परिक्षा सराव पेपरचे आयोजन करण्यात आले होते. एक गाव एक वाचनालय अंतर्गत नोंदणी केलेल्या विविध पोस्टे-उपपोस्टे-पोमकें स्तरावरुन एकुण २६४० विद्यार्थ्यांनी दिला सराव पेपर दिला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांला योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा बद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षेत मागे पडत आहेत.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परिक्षेकडे कल वाढावा तसेच त्यांना स्पर्धा परिक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडाण अंतर्गत गडचिरोली पोलीस मुख्यालय येथील शहिद पांडु आलाम सभागृह तसेच एक गाव एक वाचनालयाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पोस्टे-उपपोस्टे-पोमकें ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रत्येक वाचनालयामध्ये मोफत स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्र. ०१ टेस्ट सिरीज चे आयोजन करण्यात आले. याचा उपयोग विद्यार्थ्यांना येणाऱ्या तलाठी, वनरक्षक, संयुक्त परीक्षेकरीता होणार आहे.

यावेळी सदर स्पर्धा परीक्षा सराव पेपर करीता पोलीस मुख्यालय व विविध स्तरावरुन एकुण २६४० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणी ही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतीसाद दिला. अनेक ठिकाणी वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या.

या आयोजीत सराव पेपर दरम्यान अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी शहिद पांडु आलाम सभागृहामध्ये घेतलेल्या सराव पेपरला उपस्थित ७३० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भविष्यात येणाऱ्या तलाठी, वनरक्षक इ. परिक्षांचे सराव पेपर सुरु करत असल्याबाबतची माहीती दिली.

या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान), अनुज तारे सा व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे-उपपोस्टे- पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.