आपला जिल्हा

ओबीसी- जिल्ह्यातील तलाठी व वनरक्षक पदभरतीला स्थगिती द्या-आ.होळी यांची विधानसभेत मागणी

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रांतील १७ तलाठी व वनरक्षक पदभरती करतांना ९ जून २०१४ च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार भरण्याची  जाहिरात प्रसिद्ध झाल्याने  जिल्ह्यातील ओबीसी बांधवावर प्रचंड अन्याय झालेला आहे असून  या पदभरतीला तात्काळ स्थगिती देऊन २८ फेब्रुवारी २०२३ च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार पदभरतीची प्रक्रिया राबवून ओबीसी समाजावरील अन्याय दूर करावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून विधानसभेत केली. 

गडचिरोली जिल्ह्यात वर्ग ३ व ४ ची १७ संवर्गातील १५८ पदे भरताना  १५१ पदे पेसा क्षेत्रातील असून त्यात ओबिसी समाजाला एकही जागा नाही.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस  त्यांनी ओबीसी वरील अन्याय दूर करीत  या १७ संवर्गामध्ये पेसा क्षेत्राची लोकसंख्या निहाय वर्गवारी करून ओबीसी समाजालाही आरक्षण दिलेले आहे. त्यानुसार महामहिम राज्यपाल यांनी  २८ फेब्रुवारी २०२३ च्या अधिसूचना  काढलेली आहे. मात्र त्या अधिसूचनेचा विचार न करता २०१४ च्या  अधिसूचनेनुसार पदभरती होत आहे.  असे केल्यास  या पदभरती मध्ये ओबीसी समाजावर प्रचंड अन्याय झालेला असून ओबीसी समाजाला एकही जागा देण्यात आलेली नाही त्यामुळे ह्या पदभरतीला  तातडीने स्थगिती देण्यात यावी व २८ फेब्रुवारी २०२३ च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार पदभरतीची प्रक्रिया राबवावी अशी मागणी आमदार डॉ देवराव जी होळी यांनी या प्रसंगी केली.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.