आपला जिल्हाराजकीय

डॉक्टरांनी विधानसभेसाठी उभे राहु नये- रुपेश वालके. 

गडचिरोली, प्रतिनिधी :-

विधानसभा क्षेत्रातील राजकारणात डझनभर डॉक्टर उभे राहण्यास ईच्छुक आहेत. डॉक्टरांनी राजकारणाच्या भानगडीत न पडता त्यांनी रुग्णाची सेवा करावी, गोरगरीब रंजल्या गाजल्याची सेवा करावी , समाजाची सेवा करावी कारण डॉक्टरांनी आरक्षणाचा फायदा घेऊन डॉक्टर झालेले आहेत. राजकारणात उभे राहणाऱ्या डॉक्टरावर निर्बंध यायला पाहिजे डॉक्टर राजकारणात उभे राहात असल्यास त्यांनी आपली पदवी हठवावी अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रुपेश वालके गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील स्थानिक रेस्ट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत तुन केली आहे.

पत्रकार परिषदेला सामाजीक कार्यकर्ते रुपेश वालके, जमील शेख, नरेश बुरे, भारत बुरांडे, तेजश रहाटे, लियाकत शय्यद, अक्षय मेश्राम आदिची उपस्थिती होती.

डॉक्टर जर राजकारणात आले नाही तर आरोग्य मंत्री कोण बनेल , शिक्षक जर राजकारणात आले नाही तर शिक्षण मंत्री कोण बनेल ? असा प्रतिप्रश्न पत्रकारांनी विचारले असता. माझे वैयक्तीक मत आहे असे वालके म्हणाले. येत्या गडचिरोली विधानसभेच्या निवडणुकीत आपणही ताकतीनिशी उभे राहण्याचा सुतोवच रुपेश वालके यांनी पत्रकार परिषदेत केला.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.