ताज्या घडामोडीदेश विदेश

अजित पवार यांच्या स्मरणार्थ ‘लाडकी बहीण’ योजनेला नाव विचाराधीन – मुख्यमंत्री

हरिद्वार, प्रतिनिधी :-
दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मरणार्थ ‘लाडकी बहीण’ किंवा अन्य शासकीय योजनेला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हरिद्वार येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्या कार्याची दखल घेत विविध योजनांना त्यांचे नाव देण्याबाबत अनेक प्रस्ताव सरकारकडे आले आहेत. या प्रस्तावांवर सरकार सकारात्मक विचार करत असून याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात आणि विकासकामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे नमूद करत त्यांच्या स्मृती जपण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker