ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

IAS अधिकारी चंद्रकांत डांगे यांना पदोन्नती

मुंबई, प्रतिनिधी :

भारतीय प्रशासन सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. चंद्रकांत डांगे यांना महाराष्ट्र शासनाने मोठी प्रशासकीय पदोन्नती दिली आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने त्यांना अधिकालिक वेतन श्रेणी (पे मॅट्रिक्स लेव्हल-14) मध्ये पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला असून ही पदोन्नती दिनांक १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

शासन आदेशानुसार एमसीटीपी (Phase-IV) प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अधीन राहून श्री. डांगे यांना स्थानापन्न पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पदोन्नतीनंतरही ते सध्या कार्यरत असलेल्या नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा विभाग या महत्त्वाच्या पदावरच पुढे कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या पदाची श्रेणी अधिकालिक वेतन स्तरात उन्नत करण्यात आली आहे.

श्री. डांगे यांनी प्रशासनात काम करताना कार्यक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराची छाप निर्माण केली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे नागरी पुरवठा व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास प्रशासनातील वर्तुळातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने त्यांच्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन करून पुढील प्रशासकीय कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker