आपला जिल्हा

प्रत्येक घरावर फडकवा तिरंगा-जिल्हाधिकारी संजय दैने

13 ते 15 ऑगस्ट ‘हर घर तिरंगा’ अभियान

गडचिरोली,प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांत आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

        स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ फडकावून हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे. सरकारी इमारतींवर आकर्षक विद्युत रोशनाई करावी. देशभक्तीपर गीते आणि संदेश प्रसारीत करावे. तसेच ‘तिरंगा सेल्फी पॉईंट्स’ वर तिरंगा ध्वजासोबतचा सेल्फी काढून https://harghartiranga.com   या संकेतस्थळावर अपलोड करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या आहेत. यासोबतच राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्याची खबरदारी घेण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker