आपला जिल्हाताज्या घडामोडी
५ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अस्थिकलश गडचिरोलीत दाखल

गडचिरोली, प्रतिनिधी :-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार हे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे लँडिंग करताना झालेल्या विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोकाची लहर पसरली आहे.
जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, पत्रकार, व्यापारी संघटना आणि नागरिकांनी सहानुभूती व्यक्त करत अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष डॉ. सोनल कोवे व रायुकाँ जिल्हाध्यक्ष व नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी केले आहे.



