ताज्या घडामोडी

ओबीसी हक्कांसाठी ‘मंडल यात्रा’ गडचिरोलीत दाखल – मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यात्रा काढावी : राज राजापूरकर

महिलांचा “एक राखी मंडल के लिये”चा भावनिक संदेश

गडचिरोली, प्रतिनिधी :
ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी लढा पुन्हा पेटला आहे. ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथून ऐतिहासिक मंडल यात्रा सुरू झाली असून, आज ती गडचिरोलीत दाखल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखालील या यात्रेने गामा येथे पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले.

राजापूरकर म्हणाले –

 “एकेकाळी मंडल आयोगाच्या अहवालाच्या विरोधात भाजपने ‘कुमंडल यात्रा’ काढली आणि ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला. हा इतिहास देश विसरलेला नाही. आज परिस्थिती बदलली आहे. जर खरोखरच ओबीसींच्या न्यायासाठी उभे राहायचे असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंडल यात्रा काढावी, आणि जनतेसमोर प्रामाणिकपणे भूमिका स्पष्ट करावी.”

शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि ३५८ तालुक्यांतील गावागावात पोहचून, ओबीसींच्या हक्कांची जाणीव जनतेपर्यंत पोहचवणार आहे. ही यात्रा फक्त राजकीय मोहिम नाही, तर ओबीसींच्या आत्मसन्मानाचा आणि अस्तित्वाच्या लढ्याचा प्रेरणादायी प्रवास आहे.

गडचिरोलीत यात्रेचे स्वागत महिलांनी भावनिक पद्धतीने केले. “एक राखी मंडल के लिये” या घोषणांनी वातावरण दुमदुमले, आणि राखी बांधून समाजाच्या एकतेचा, बंधुभावाचा आणि न्यायासाठीच्या बांधिलकीचा संदेश देण्यात आला. हा क्षण अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला.

या वेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट) गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गण्यार पवार, जिल्हा उपाध्यक्ष नाईन शेख, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, शहराध्यक्ष विजय गोरडवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंडल यात्रेच्या जयघोषात गडचिरोलीचे वातावरण भारावून गेले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker