आपला जिल्हा

माडे तुकूम येथील जलजीवन मिशनची पाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू!

ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा संताप

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरालगतच्या माडे तुकूम गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली पाण्याच्या टाकीची उभारणी गेली चार वर्षांपासून रखडली असून, अद्याप ती पूर्णत्वास गेलेली नाही. परिणामी गावकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

गावातील प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी करण्यासाठी रस्ते फोडून पाइपलाइन टाकण्यात आली. परंतु खोदकामानंतरची माती व मलमा रस्त्याच्या कडेला टाकून सोडण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: पावसाळ्यात या मातीवरून वाहने घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय बोबाटे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “चार वर्षे उलटली तरी पाणीपुरवठा सुरू झाला नाही, उलट अपूर्ण कामांमुळे त्रास वाढला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींनी तात्काळ हस्तक्षेप करून ठेकेदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

“गावात उभारलेली पाण्याची टाकी आता पाणीपुरवठा करण्याऐवजी शोभेची वास्तूच ठरत आहे का?” असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.

खोदलेले रस्ते आणि माती

 

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker