आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

उद्योजक सुनील पोरेड्डीवार यांना ‘विदर्भ रत्न पुरस्कार–२०२६’ प्रदान

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली येथील उद्योजक तथा समाजसेवक सुनील केशवराव पोरेड्डीवार यांना उद्योग, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘विदर्भ रत्न पुरस्कार–२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

गडचिरोलीसारख्या आदिवासी, ग्रामीण व मागासलेल्या जिल्ह्यात गेल्या सुमारे २५ वर्षांपासून उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

नाशिक येथील रिसील डॉट इन संस्थेच्या वतीने रविवारी, दि. १९ जुलै २०२६ रोजी नागपूर येथील सॉलिटेअर हॉटेल अँड बँक्वेट हॉल येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण समारंभात प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह (मोमेंटो) आणि गौरवपत्र प्रदान करण्यात आले.

सुनील पोरेड्डीवार यांनी उद्योग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करताना सामाजिक बांधिलकी जपत विविध शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रमांमध्येही सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या सन्मानाबद्दल सुनील पोरेड्डीवार यांच्यावर गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील विविध भागांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker