आपला जिल्हाताज्या घडामोडीनिवडणूक
काँग्रेसचे माजी आमदार तलांडी परिवारवर मर्जी

उदय धकाते
गडचिरोली :-
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणात बंडखोरी झाली असून पक्षाच्या तीन माजी आमदार यांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल करून नेत्यांची झोप उडवून दिली होती. यातील माजी आमदार कोवासे यांचे पुत्र एड. विश्वजीत कोवासे यांची समजूत काढल्यामुळे त्यांनी उमेदवार अर्ज मागे घेतला.

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत माजी आमदार आनंदाराव गेडाम यांना काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी पक्षाची बंडखोरी करीत निवडणुकीच्या रिंगणात आरमोरी विधानसभा क्षेत्रात उतरले आहे. त्यांच्यावर व अन्य बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यावर काल पक्षाने कारवाई करीत ६ वर्षाकरिता निलंबित केले. परंतु अहेरी मतदार संघातून दोन बंडखोर उमेदवार वर अद्याप कारवाई न केल्याने काँग्रेस व आघाडी मध्ये आश्चर्य व्यक्त करीत पक्ष नेतृत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत आहे.

अहेरीतून काँग्रेस चे माजी आमदार पेंटा रामा तलांडी आणि महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस च्या उपाध्यक्ष श्रीमती सगुणा तलांडी यांच्या कन्या नीता पेंटा तलांडी काँग्रेस पक्षांकडे उमेदवारी मागितली होती परंतु येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जागा गेल्याने काँग्रेस कडून कोणताही पंजावर उमेदवार नाही आहे. नीता तलांडी या आता प्रहार पक्षा कडून येथे रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विजयासाठी काँगेस चे माजी आमदार पेंटा रामा तलांडी आणि आई सगुणा तलांडी या प्रचार करीत आहेत. तसंच बंडखोर हनुमंतू मडावी यांच्यावर सुद्धा पक्षाने कोणतीही कारवाई न केल्याने महाविकास आघाडी चे उमेदवार अडचणीत आले असून काँगेस नेत्यांची दुटप्पी भूमिके मुळे कार्यकर्ते संब्रमित झाले आहे.
माजी आमदार तलांडी परिवारवर अद्याप कारवाई झाली नाही.काँग्रेस पक्षातील कोणत्या नेत्याची मर्जी आहे. या मुळे काँग्रेस पक्ष गडचिरोली आणि आरमोरी मतदार क्षेत्रातील उमेदवार अडचणीत येणार आहे.अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्ते करीत आहे.



