ताज्या घडामोडी

गडचिरोलीतील आदिवासी संस्कृतीच्या महासंगमात अमृता फडणवीसांची प्रमुख उपस्थिती

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरात प्रथमच भव्य स्वरूपात गडचिरोली ट्रायबल महोत्सव तसेच राष्ट्रीय स्तरावरील ‘कोया किंग अँड क्वीन’ ट्रायबल कल्चरल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती ऑल मीडिया असोसिएशन च्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये या कार्यक्रम ची माहिती देण्यात आली.

हा दोन दिवसीय महोत्सव २८ व २९ जानेवारी २०२६ रोजी धानोरा मार्गावरील महाराजा मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे. हिरा–सुका बहुउद्देशीय आदिवासी संस्था व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येत आहे.

या महोत्सवात महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा व आंध्र प्रदेशातील आदिवासी कलाकार सहभागी होणार असून, आदिवासी जीवनशैली, पारंपरिक नृत्य, लोकगीते, वेशभूषा, कला व संस्कृतीचे भव्य दर्शन नागरिकांना अनुभवता येणार आहे.

बुधवार (ता. २८) रोजी सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमास प्रारंभ होणार असून, सकाळी ११ वाजता अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यानंतर एकल आदिवासी गीतगायन, ग्रूमिंग स्पर्धा व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. गुरुवार (ता. २९) रोजी दुपारी २ वाजता मुख्य स्पर्धांना सुरुवात होईल. सायंकाळी ७ वाजता पारितोषिक वितरण तर रात्री १० वाजता महोत्सवाचा समारोप होणार आहे.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजन पूर्णतः निःशुल्क आहे. स्पर्धकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क घेतले जाणार नाही. सहभागी स्पर्धक व एका पालकासाठी मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आदिवासी हस्तकला, साहित्य व खाद्यपदार्थ विक्रीसाठी मोफत स्टॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आदिवासी संस्कृतीचे जतन, संवर्धन व राष्ट्रीय पातळीवर प्रचार-प्रसार करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असून, विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच शहरात आदिवासी संस्कृतीचा असा भव्य उत्सव साजरा होणार असून, यामुळे जिल्ह्याची ओळख देशपातळीवर अधिक ठळक होणार आहे.

पत्रकार परिषदेला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, कोषाध्यक्ष जाहिदा शेख, शहराध्यक्ष स्नेहा मेश्राम, उपाध्यक्ष भूषणा खेडेकर, शहर सचिव राणी गोपशेट्टीवार आदी उपस्थित होते.

स्पर्धा नोंदणी संपर्क :

📞 9405207739

आदिवासी साहित्य विक्रीसाठी मोफत स्टॉल नोंदणी :

📞 9423598614

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker