ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
३० मार्चपासून राज्यात पुन्हा वादळी पावसाचे सावट; गारपिटीचाही इशारा

गडचिरोली, प्रतिनिधी :-
राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच आता पुन्हा एकदा निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळणार आहे. ३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
पावसाचे वेळापत्रक आणि प्रभावित क्षेत्र:-
३० मार्च:- खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
३१ मार्च: या दिवशी पावसाचा जोर थोडा कमी असला तरी हवामान अस्थिर राहील.
१ ते ४ एप्रिल: या काळात पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे.



