मुंबई,प्रतिनिधी :-
वडील आणि बहीण ठाकर, अर्जदार कोण ? मुंबई उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल करीत अर्जदाराला तात्काळ वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश पारित केले आहे. या न्याय निर्णयाने ठाकर जमातीत या निर्णयचे स्वागत करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अथर्व शरद ठाकूर, अमृता राजन ठाकूर, अंकिता मंगेश ठाकूर तिघेही राहणार कणकवली, यांचा अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र ठाणे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने मराठा नोंदी व जुन्या नोंदीत खाडाखोड असल्याचे कारण पुढे करून अवैध ठरवले होते. तिन्ही अर्जदारानी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुशांत येरमवार यांच्यामार्फत मा. मुंबई उच्च न्यायालयात याचिका (WP. 2070/2025) दाखल केले होते.
न्यायालयाचा निर्णय लिंक वरून वाचा निळ्या ओळीला टिक करा 👇
अथर्व आणी इतर 2 ठाकर वैधता
मा. मुंबई उच्च न्यायालयात मा. न्या. श्री. रविंद्र वी. घुगे व मा. न्या. श्री. आश्विन डी. भोबे यांच्या समोर ॲड. सुशांत येरमवार यांनी केलेला अभ्यासपूर्ण युक्तिवादावेळी वडील आणि सख्खी बहिण ठाकर तर अर्जदार कोण ? असा संतप्त सवाल मा. उच्च न्यायालयाने ठाणे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीला यावेळी केला. तीनही अर्जदारांना तात्काळ विनाअट, विनाशर्थ वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी पारित केले.
अर्जदाराच्या वतीने भक्कम बाजू युक्तीवाद करणारे जेष्ठ विधिज्ञ ॲड. सुशांत येरमवार यांनी मांडली.