चंद्रपूर, प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गोविंद भेंडारकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. समाजकारण आणि राजकारणाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले मोलाचे योगदान कायम स्मरणात राहील.
त्यांच्या अकस्मात निधनामुळे मित्रपरिवार, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. समाजहितासाठी सदैव कार्यरत राहिलेले भेंडारकर हे समर्पित, शांत स्वभावाचे आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात होते.
भेंडारकर यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कार्याची परंपरा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
Back to top button