अपघातआपला जिल्हाताज्या घडामोडी
पोर्लाजवळ एसटी बस-कारची जोरदार धडक
कारचा पुढील भाग चक्काचूर; एक जण गंभीर जखमी, पुढील उपचारासाठी नागपूरला हलविले

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोलीहून वडसाकडे जाणाऱ्या एसटी बसला चारचाकी कारने जोरदार धडक दिल्याची घटना आज शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास पोर्ला गावाजवळ घडली. या अपघातात MH 31 GA 7863 क्रमांकाच्या कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि त्यांना उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे.




