आपला जिल्हाराजकीय

वंचित बहुजन आघाडीने थेट जनतेशी संवाद करून ईंदिरानगरातील समस्यांचा केला पंचनामा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

          वंचित बहुजन आघाडीच्या वतिने आयोजीत दुस-या दिवशीच्या थेट जनतेशी संवाद रॅली अंतर्गत ईंदिरानगरातील डोंगरभर समस्यांचा पंचनामा करण्यात आला.

        स्नेहनगर प्रभाग अंतर्गत येत असलेल्या ईंदिरानगरात गेल्या चाळीस वर्षात शासनाचा हजारो कोटी निधी विकासाच्या नावाखाली खर्च झाला परंतु अजूनपर्यंत या प्रभागात अनेक सविधाचा अभाव आहे, गेल्या 35 वर्षापासून ईंदिरानगर ही वस्ती बसली असून सुद्धा पिण्याच्या पाण्याची भयंकर मोठी समस्या आहे या प्रभागात फक्त एक टाईम संध्याकाळी नळाचे पाणी सोडल्या जाते परंतु अनेक नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणी येत नाही, बरेचदा एक गुंड पाण्यासाठी संघर्ष करावे लागते , उन्हाळ्यात तर पाण्यासाठी झगडे व मारामा-या होतात परंतु ही समस्या सोडविण्यासाठी प्रस्थापीत राजकिय पक्ष अपयशी ठरले आहेत.

     रस्ते, नाल्याची पूर्णपणे गैरसोय आहे, नगर परिषद अंतर्गत असलेल्या शाळेच्या शिक्षणाची पूर्णपणे वाट लागली आहे, पण ईकडे कोणतेही राजकिय पुढारी व प्रशासन लक्ष अजिबात लक्ष देत नाही. अशा अनेक समस्यांचा सामना ईंदिरानगरवासियाना करावा लागत आहे. ईंदिनगरात असणारे अंशी टक्के नागरिक  हे मोल मजूरी करून खाणारे आहेत त्यामूळे आमच्याकडे कोणिही लक्ष देत नाहीत कां ? असेही नागरिकांचे म्हणणे होते.

        यावेळी वंचित बहुजन आघाडीने  वेगवेगळ्या समस्यांचा पंचनामा करून जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, महिला आघाडीच्या नेत्या माताई भजगवळी, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, बाशिद शेख  यांनी जनतेशी वेगवेगळ्या समस्या संदर्भात संवाद साधला, यावेळी ईंदिरानगरातील नागरिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.