क्रीडा व मनोरंजन

शफी बोल्डेकर लिखीत नबीसाहेब हे या गीताचे झाले थाटात लोकार्पण

 ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने  ईद – ए-मिलाद निम्मित्ताने  आयोजित आॅनलाईन  कवीसंमेलन कार्यक्रमात कवी शेख शफी बोल्डेकर लिखीत  मराठी गीत ” नबीसाहेब हे ” या गीताचे नुकतेच लोकार्पण मराठी चित्रपट गीतकार प्रा. डॉ. विनायक पवार यांच्या शुभहस्ते ९ आॅक्टोंबर रोजी आॅनलाईन करण्यात आले. सदर गीत संदिप भुरे आॅफीशीयल या युट्यूब चॅनेलवर  ऐकण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

हे  दमदार मराठी गीत प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांचे शिष्य गायक विकास कौठेकर यांनी गायले आहे. या गीताला संगीताचा साज ख्यातनाम संगीतकार प्रा.संदिप भुरे यांनी चढविला आहे.गीतकार विनायक पवार म्हणाले की , शेख नबीसाहेब यांचे कार्य खूप मोठे आहे. ” नबीसाहेब हे ” गीत सर्वांगाने समृद्ध व संपन्न असल्याचे मत व्यक्त केले.

हिंदी चित्रपट गीतकार गुलजार यांचा संदर्भ देऊन कलावंत हा जन्मजात नसतो. तर जन्मजात असते ती कलावंताची संवेदना. वर्तमानाची धूळ व रानकिडे कलावंताची दृष्टी अंधूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कलावंतानी आपली दृष्टी नेहमी साफसुतरी ठेवली पाहिजे.शफी बोल्डेकर माझा मित्र असून त्याची गीत-कविता सामाजिक अर्थाने  संपन्न आहे.अशा शब्दात शफी बोल्डेकर यांचा गौरव केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष कवी अहमद पिरनसाहाब शेख हे होते. तर उद्घाटक म्हणून सुप्रसिध्द साहित्यिक मुबारक उमराणी, सांगली यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. हाशम इस्माईल पटेल,  डाॅ. सय्यद जब्बार पटेल, जाफरसाहाब शेख यांची उपस्थिती होती.यावेळी निमंत्रितांचे कवीसंमेलन पार पडले.यात कवी प्रा.संदीप देविदास पगारे,  वाय. के. शेख, महासेन प्रधान,  बा. ह. मगदूम, प्रा. लक्ष्मण गायकवाड,  प्रा. पांडूरंग मुंजाळ,  अविनाश शिंदे, सतिश तावरे,  मनोहर गायकवाड, शेेख सिकंदर शेख सत्तार (शिरपूर), बाबुराव पाईकराव, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, कवयित्री रजिया दबीर यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवयित्री अनिसा सिकंदर शेख यांनी केले.तर दमदार व ताकतीचे सूत्रसंचालन कवी गौसपाशा शेख  यांनी केले.तर आभार कवी शफी बोल्डेकर यांनी मानले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.