क्रीडा व मनोरंजन

गडचिरोलीत शनिवारी उजळणार पहाट स्वरांच्या दिव्यांची

गडचिरोली,प्रतिनिधी :-

आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांसाठी सर्वपरिचित असलेल्या अजब-गजब विचार मंचाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी पहाट हा स्वरमयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी (ता. २२) ही स्वरांच्या दिव्यांची पहाट उजळणार आहे.

शनिवारी पहाटे ५.३० वाजता स्थानिक गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील विद्याभारती कन्या हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित पहाट स्वरांच्या दिव्यांची या स्वर मैफलीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक पूर्णा खानोदे, गायिका वाचस्पती चंदेल, संगीत सम्राट फेम लीलाधर पाटोळे, गायिका मनीषा वानखेडे, भाग्यश्री खानोदे स्वरांचे रंग भरणार आहेत.

या कार्यक्रमाचे निवेदन चंद्रपूर आकाशवाणी केंद्रातील निवेदिका प्रज्ञा जीवनकर करणार आहेत. तसेच तबलावादक अजय चव्हाण, बासरीवादक आकाश सैतवाल, संवादिनी (हार्मोनियम) वादक प्रवीण काळे, कीबोर्ड पवन भारस्कर, पॅड ज्ञानेश्वर धनभर, मंजिरीवादक सौरव ठमके स्वरांना वाद्याची साथ देणार आहेत.

या कार्यक्रमासाठी अजब-गजब विचार मंचाचे सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, अरविंद कात्रटवार, सचिन मून, सतीश विधाते, विश्राम होकम, सुभाष धंदरे, दत्तू सुत्रपवार, मिलिंद उमरे, नंदू काथवटे, सूरज खोब्रागडे, राजेश गोहणे, उदय धकाते, अनिल पोहणकर सहकार्य करीत आहेत. या स्वर मैफलीला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.