ताज्या घडामोडी
अध्यक्षपद हा चंद्रपूरकरांचा सन्मान धन्यवाद मोदीजी- हंसराज अहीर

चंद्रपूर,प्रतिनिधी :-
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या आशिर्वादाने 4 वेळा खासदार म्हणून निवडून आलो, जनसेवा करण्याची संधी दिली, चंद्रपूरकरांचा ऋणी असून मा नरेंद्र मोदी जी व पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपदी निवड करुन चंद्रपूरकरांचाच नाही तर महाराष्ट्राचा सन्मान केला असल्याचे प्रतिपादन स्थानिक गांधी चौक येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी व भाजपा पक्ष श्रेष्ठींचे आभार व्यक्त करण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चा, अनु. जाती मोर्चा, अनु. जमाती मोर्चा, भटक्या-विमुक्त जाती मोर्चा, अल्पसंख्यांक मोर्चा, भाजपा महिला मोर्चा, वैद्यकिय आघाडी तर्फे आयोजित सभेत नवनियुक्त राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी केले.
सदर सभेस पद्मश्री माजी खासदार विकास महात्मे, वणीचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश महामंत्री संजय गाते, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, ओबीसी मोर्चाचे विदर्भ संघटक रविंद्र चव्हाण, खुशाल बोंडे, अंजलीताई घोटेकर, अनिल फुलझेले, अल्काताई आत्राम, राजेश मून, राजेंद्र गांधी, डॉ. एम. जे. खान, दिनकर पावडे, तारेंद्र बोर्डे, राजू घरोटे, विजय चोरडीया, ब्रिजभूषण पाझारे, विनोद शेरकी, प्रकाश राठोड, विजय पिदुरकर, रत्नमालाताई भोयर, विवेक बोडे, रघुवीर अहीर, संजय तिवारी, रविंद्र गुरनुले, राजू गायकवाड, जुम्मन रिजवी, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर रवि लोणकर, अरुण तिखे, मोहन चौधरी, धनराज कोवे, धम्मशिल भस्मे, अमिन शेख, दिवकार पुध्दटवार, राजू येले, राजू कागदेलवार, प्रदिप किरमे, शशीकांत मस्के, शैलेश इंगोले, यांची प्रमुख उपस्थिती होती.




