महाराष्ट्रसाहित्यिक

‘मोरगाड’ ‘भुभरी’, ‘संत गाडगेबाबांचे व्यक्तीमत्व (जीवनकला)’ला साहित्य पुरस्कार जाहिर

गडचिरोली,प्रतिनिधी :-

‘मोरगाड’ ‘भुभरी’, ‘संत गाडगेबाबांचे व्यक्तीमत्व (जीवनकला)’ला  झाडीबोली साहित्य मंडळाचे सन २०२२ चे वार्षिक साहित्य पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे. 

झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या तीन गटातील  उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी तसेच एका झाडीपट्टी लोककलावंतास पुरस्कार घोषित केल्या जाते. त्यासाठी इच्छूक साहित्यिकांना व लोककलावंताना मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते.  

निवड समितीने उत्कृष्ट झाडीपट्टी लोककलावंत पुरस्कारासाठी  दादा अंताराम पारधी (मालडोंगरी) यांना घोषित करण्यात आलेला आहे. तसेच उत्कृष्ट प्रमाण मराठी काव्य निर्मितीसाठी अरूण झगडकर यांच्या ‘भुभरी’ या काव्यसंग्रहास, उत्कृष्ट झाडीबोली साहित्य निर्मिती साठी जुनासुर्लाचे लक्ष्मण खोब्रागडे यांच्या ‘मोरगाड’ या संग्रहाची निवड करण्यात आली आहे.  तर या संकीर्ण गटातील  उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रा. रघुनाथ कडवे व बंडोपंत बोढेकर लिखीत ‘संत गाडगेबाबांचे व्यक्तीमत्व (जीवनकला)’ या पुस्तकास, मंडळाकडून पुरस्कार जाहिर करण्यात आलेले आहे.

सदर पुरस्काराचे वितरण लवकरच गडचिरोली येथे होणाऱ्या विदर्भस्तरीय खुल्या कवीसंमेलनात करण्यात येणार आहे. नुकतीच मंडळाची महत्त्वाची सभा लेनगुरे भवनात ज्येष्ठ साहित्यिक तथा  जिल्हा प्रमुख डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  त्याप्रसंगी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विनायक धानोरकर, प्रसिद्ध गायक पुरूषोत्तम ठाकरे, उपेंद्र रोहणकर, सहसचिव संजीव बोरकर, सौ. लेनगुरे यांची उपस्थिती होती.  सभेचे उत्तम सूत्रसंचालन कवी संजीव बोरकर यांनी केले .

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.