आपला जिल्हा
समस्त जनतेला दिल्यात दीपावलीच्या शुभेच्छा आ. डॉ देवरावजी होळी

गडचिरोली,प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील जनतेचे कष्ट दूर करून त्यांच्या सुख-समृद्धीसाठी, समाधानासाठी प्रत्येक घरी आशीर्वाद रूपाने नांदावे आपल्या आशीर्वादाने माझ्या जनतेचे सदैव कल्याण माता लक्ष्मीने करावे असे साकडे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी माता श्रीमहालक्ष्मीच्या पूजनाच्या निमित्ताने घातले.
आपल्या चामोर्शी येथील निवासस्थानी दीपावली निमित्त आ. डॉ देवरावजी होळी यांनी परिवारासह लक्ष्मीपूजन केले. या पूजनाच्याप्रसंगी त्यांच्या सौभाग्यवती सौ बिणाराणी देवराव होळी ,मुलगी डॉक्टर देवश्री देवराव होळी यांनीही जनतेच्या कल्याणाची कामना केली.




