गडचिरोली,प्रतिनिधी :-
ऑलम्पिक असोसिएशन संलग्नित महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन द्वारा आयोजित 53 वी राज्य स्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धा वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे दि.15 ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित केलेल्या आहेत,सदर स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ सहभागी राहणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ निवडण्या साठी दि. 11डिसेंम्बर 2022 रोज रविवार ला सकाळी 11 वाजता एम.जे.एफ व्हॉलीबॉल क्लब आष्टी जिल्हा गडचिरोली च्या मैदानावर एक दिवसीय निवड चाचणी सामने घेण्यात आली होती.यात पुरुष व महिला संघाची निवड करण्यात आली.
या निवड बद्दल महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन चे उपाध्यक्ष व गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन चे सचिव सतीश पवार, एम. जे. एफ.क्लब आष्टी चे मार्गदर्शक अमीत शेंडे अध्यक्ष अनिल पोरेड्डीवार, उपाध्यक्ष महेश राऊत,कोषाध्यक्ष रवी नंदनपवार,सदस्य नितीन जेंगठे यांनी अभिनंदन केले आहे.
Back to top button