ताज्या घडामोडीदेश विदेश

गडचिरोलीत चकमकीत एक माओवादी ठार, शस्त्रसाठा जप्त – जवान जखमी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

दिनांक ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी कंपनी क्रमांक १० चे उर्वरित माओवादी सदस्य तसेच छत्तीसगडमधील अज्ञात माओवादी दलमच्या हालचालींबाबत विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबविण्यात आली. त्याच रात्री १४ सी-६० पथकांसह मौजा फोदेवाडा गावापासून काही किलोमीटर अंतरावर, नारायणपूर-गडचिरोली जिल्हा सीमेवरील जंगल परिसरात कारवाई सुरू करण्यात आली.

काल दिवसा माओवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले असून मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र, दुर्गम भूभाग आणि घनदाट जंगलामुळे माओवाद्यांचा अचूक शोध लागला नाही.

आज सकाळी कारवाई अधिक तीव्र करत अतिरिक्त चार सी-६० पथके तसेच सीआरपीएफ क्यूएटीचे एक पथक अभियानात सहभागी करण्यात आले. सकाळपासून सुरू असलेल्या अधूनमधून चकमकीदरम्यान एका पुरुष माओवादी ठार झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून एक एके-४७ आणि एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे. मृत माओवादीची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच आणखी काही माओवादी जखमी किंवा ठार झाल्याची शक्यता तपासली जात आहे.

दरम्यान, आज संध्याकाळी माओवाद्यांकडून करण्यात आलेल्या जोरदार गोळीबारात सी-६० पथकातील एक जवान गोळी लागून जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर जंगल परिसरात सध्या शोधमोहीम सुरू असून कारवाई पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाकडून अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker