सामाजीक

३० रक्तदात्यांनी केले शिबिरात रक्तदान

गडचिरोली,प्रतिनिधी :-

    भगवान सत्यसाईबाबांची माता ईश्वरम्मा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जिल्हा सत्य साई सेवा संघटनेकडून नुकतेच  रक्तदान शिबीराचे आयोजन साई सत्संग हॉल,गडचिरोली येथे  करण्यात आलेले होते.

   शासकीय रूग्णालयातील रक्तपेढीत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे. तेथे रक्ताचा पुरवठा नियमित रहावा या उद्देशाने  सदर शिबीराचे आयोजन केलेले होते.

  ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ असल्याने या शिबिरात जास्तीत जास्त रक्त दात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक दायित्व पार पाडावे असे आवाहन सत्य साई सेवा संघटनेकडून करण्यात आलेले होते. या आवाहनास ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले.

  या शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील शासकीय रक्त पेढीच्या चमूतील रक्त  संकलन अधिकारी डॉ. तुमरेटी,पी. आर. ओ. सतीष तडकलावार,तंत्रज्ञ मोहिनी चुटे, सिस्टर सुरज चांदेकर,सहाय्यक प्रमोद देशमुख, वाहन चालक बंडु कुंभारे  यांनी रक्त संकलनाचे कार्य उत्तमरित्या पार पाडले तर सत्य साई संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.