अपघात

गडचिरोली शहरात १० ठिकाणी गतिरोधक करा, नगर परिषदेचे पत्र

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरातील वाढते अपघाताची गंभीर दखल नगर परिषद गडचिरोली ने घेतली असून राष्ट्रीय महामार्ग विभाग, गडचिरोली ला शहरात ताबडतोब १० ठिकाणी गतिरोधक बांधण्यात यावे असे पत्र मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी दिले आहे.

गडचिरोली शहरातील राष्ट्रीय महामार्ग हे जीवघेणी ठरत आहेत. मागील काही वर्षात अनेकांचे अपघातात मृत्यू झाला आहे. यात नागरिक विध्यार्थी, शिक्षक,व्यावसायिक, कर्मचारी वर्ग मोठया प्रमाणात आहेत. अनेक जखमी झाले आहेत.

१ मे २०२३ ला कारगील चौकात एक शालेय आदिवासी विद्यार्थी हा ट्रक द्वारे चिरडला गेल्याने जागेवर मृत्यू पावला. हा विध्यार्थी गडचिरोली शहरात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेड्यातून आला होता. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. 

शहरातील वाढते अपघाताची गंभीर दखल कारगील चौक वासियांनी घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांना निवेदन देऊन शहरात वाढते अपघात,  अतिक्रमण आणि गतिरोधक बांधण्यासाठी चर्चा केली. या निवेदनाची नगर प्रशासनाने गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, गडचिरोली ला पत्र देऊन शहरात १० ठिकाणी गतिरोधक ताबडतोब बांधन्यात यावे असे आज पत्र दिल. सदर पत्र काढण्यात करिता उदय धकाते यांच्या पाठपुरावा ला यश मिळाले आहे.

नगर परिषद अंतर्गत क्षेत्रातील पुढील ठिकाणे हे अतिवर्दळीचे असून. सदर महामार्गालगत शाळा, महाविद्यालय, शैक्षणीक संस्था व बस स्थानक असल्याने सदर रस्ता ओलांडतांना शाळकरी विद्यार्थी,नागरीकास कर्मचारी व बस प्रवासी यांना अपघात होण्याची शक्यता मोठया प्रमाणात आहे. सदर ठिकाणी वाहनाचा वेग कमी करण्याकरीता गतिरोधक उभारण्याची सूचना नगर परिषद कडे उदय धकाते यांनी केली आहे.ती मंजूर झालेली आहे.

१. चंद्रपुर – धानोरा महामार्गावरील कार्मेल शाळेकडे जाणा-या रोड जवळ.

२. मौजा- लांझेडा येथे लांझेडा गावामध्ये जाणा-या व मुलींचे वस्तीगृहाकडे जाणा-या मार्गाजवळ,

३. इंदीरा नगरकडे जाणा-या वळन मार्ग नाक्याजवळ

४. चंद्रपुर रोड येथील कारगील स्मारक जवळ.

५. गडचिरोली- धानोरा महामार्गावरील बाबुराव चौक जवळ.

६. चंद्रपुर रोड येथील बजाज शोरूम जवळ,

७. आय.टी.आय. चौक येथे.

८. इंदीरा गांधी चौक येथील चारही मुख्य रस्ते.

९. जिल्हा न्यायालय जवळ..

१०. महिला महाविद्यालय समोर (नगर भवन जवळ)

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.