आपला जिल्हासामाजीक
गडचिरोली शहरातील स्वातंत्र्य स्मारकाचे सौदर्यकरण काम सुरु
गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली शहरातील दुर्लक्षित असलेले स्वातंत्र्य स्मारकाचे सौन्दर्यकरणाचे काम अखेर सुरु करण्यात आले आहे.
सदर स्मारक हे दुर्लक्षित आहे. जयस्तंभ म्हणून ओळख आहे. यास स्वातंत्र्याचा प्रतीक म्हणून गडचिरोली कर ची ओळख आहे. या स्मारकचे सौदंर्य करण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते यांनी प्रशासनाला निवेदन देऊन केली होती. या मागणीची त्वरित दखल घेण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्य चे संपूर्ण विश्वात ७५ वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गडचिरोली शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा कारण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रचार करीत आहे.
गडचिरोली शहराचा स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे स्थान आहे.

आज या स्मारकची दुरुस्तीचे काम सुरु असताना मागणी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोलीचे अध्यक्ष उदय धकाते यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
मुख्याधिकारी वाघ हे जातीने या स्मारकच्या दुरुस्तीकडे लक्ष देऊन आहेत.
भारताला स्वातंत्र्य 15 आगस्ट 1947 ला मिळवून देण्यात गडचिरोलीचा सिंहाचा वाटा आहे. गडचिरोलीतील स्वातंत्र्यलढ्यात आंदोलनात सहभागी असलेले सर्व नागरिकांनी स्वातंत्र्य चे प्रतीक म्हणून गडचिरोली मध्ये महात्मा गांधी चौकात स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून जय स्तंभ ची निर्मिती केलीआहे. या जय स्तंभ वरील अशोकचक्र निखळून पडले आहे.
या स्मारकाचे सुद्धा हे अमृत महोत्सवी वर्ष आहे हे नमूद करीत आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]




