आपला जिल्हाताज्या घडामोडी

शिवसेना जिल्हाप्रमुख पवन राधे गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

गडचिरोली, प्रतिनिधी :-

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे गडचिरोली जिल्हाप्रमुख पवन राधे गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय गेडाम व मित्रपरिवाराच्या वतीने घेण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता सेमाना देवस्थान, गडचिरोली येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यानंतर दुपारी १२ वाजता महिला हॉस्पिटल, गडचिरोली येथे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी माणुसकीचा घास हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता ग्रामीण वडसा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे. तसेच दुपारी ३ वाजता चामोर्शी येथे गोशाळेत गोमातेला चारा देण्यात येणार आहे.

या विविध सामाजिक उपक्रमांसोबतच सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक हॉल, आरमोरी रोड, गडचिरोली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक व मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“चला! एकत्र येऊया… समाजासाठी काम करूया… जय शिवसेना! जय महाराष्ट्र!!” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

“आवर्जून उपस्थितीत दर्शवावी ही विनंती”, असे आवाहन पवन भाऊ गेडाम व मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker