आपला जिल्हाताज्या घडामोडी
गडचिरोलीच्या वनसंपदा, वन्यजीव संरक्षण आणि स्थानिक रोजगारासाठी ठोस उपाययोजन 50 लाख भरपाई पाठपुरावा-आमदार डॉ. नरोटे

मुंबई, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील वनसंपदा, वन्यजीव संरक्षण तसेच स्थानिक रोजगारनिर्मितीशी संबंधित विविध प्रश्नांबाबत गडचिरोली चे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.
यावेळी मानव-वन्यजीव संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासह वनसंपदेच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी भरपाई ५० लाख रुपयांपर्यंत वाढवावी तसेच मृतांच्या वारसांना नोकरी देण्याची तरतूद करावी, अशी मागणीही करण्यात आली.




