ताज्या घडामोडी

गडचिरोली शहरातील अतिक्रमण,प्रशासन झोपेत

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरातील चंद्रपूर व धानोरा या  राष्ट्रीय महामार्गावरचे अतिक्रमण दोन ,तीन महिन्यांपूर्वी काढण्यात आले होते.तेव्हा पासून काही दिवस पर्यंत अतिक्रमण धारकांनी कुठलीही दुकान लावली नाही पण आज मुख्य इंदिरा गांधी चौकापासून चारही दिशेवर अतिक्रमण धारकांनी आपले बसस्थान मांडल्याचे चित्र दिसत आहे.

गडचिरोली शहरातील काढलेले अतिक्रमण हे राष्ट्रपती,व मुख्यमंत्री यांच्या दौऱ्या पुरतेच का अशी शंका शहर वासियांनी केली आहे,राष्ट्रपती व मुख्यमंत्री गडचिरोली दौरा आटोपून गेल्यानंतर अतिक्रमण जैसे थे झाल्याने शहर वासीयांकडून कुतूहल व्यक्त केला जात आहे.

महामार्गावर वाहनांची अवैध पार्कींग

शहरातील पार्कींग सुविधेचा अभाव असल्याने वाहनधारक रस्त्यावरच वाहने पार्क करतात. रस्त्यावर ठेवलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.ग्राहक रस्त्यावरच वाहन उभे करुन या दुकानांमध्ये जात आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

सूर्यकांत पिदूरकर,मुख्याधिकारी, नगर परिषद गडचिरोली.

पण त्या अतिक्रमण धारकावर कारवाईसाठी नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण धारकांवर कडक कारवाई करणारी मोहीम तेज केली होती व ती मोहीम राबवण्यासाठी एक वाहन सुद्धा खरेदी केले होते.पण ते वाहन आज च्या स्थितीत नगर परिषद गेट समोर उभे आहे.

सध्या पावसाचे दिवस असल्याने जे कोणी अतिक्रमणधारक आपले पक्के शेड, दुकान थाटत असतील त्यांना,जेसीबी च्या साहायाने नक्कीच उठवू अशी माहिती “महाभारत न्यूज” ला दिली.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.