ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्मचाऱ्यांना ३ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याची मागणी

मुंबई, प्रतिनिधी :-

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र (शासन मान्यताप्राप्त) यांनी राज्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षकांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव महागाई भत्ता मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, वाढत्या महागाईचा विचार करून केंद्र शासनाने १ जुलै २०२५ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ टक्के वाढीव महागाई भत्ता मंजूर केला असून सध्या त्यांना एकूण ५८ टक्के महागाई भत्ता लागू आहे. मात्र, राज्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षकांना अद्याप ५५ टक्के महागाई भत्ता मिळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

महागाईचा वाढता ताण लक्षात घेता, केंद्र शासनाच्या धर्तीवर १ जुलै २०२५ पासून लागू असलेली वाढ राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांना थकीत फरकासह मंजूर करावी, अशी संघटनेने विनंती केली आहे. जानेवारी २०२६ मध्ये महागाईच्या प्रमाणानुसार भत्त्यात पुन्हा वाढ अपेक्षित असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

राज्यातील कर्मचारी व शिक्षकांना वाढीव महागाई भत्ता मंजूर करून त्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी व्यक्त केली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker