आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोली सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांचा अतिरिक्त कार्यभार चंद्रपूरकडे

गडचिरोली, प्रतिनिधी :-

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गडचिरोली सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता पदाच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.

शासनाच्या दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या कार्यालयीन आदेशानुसार, गडचिरोली सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती सोनाली चव्हाण, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, चंद्रपूर यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.

यापूर्वी श्रीमती निता ठाकरे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूर यांच्याकडे गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. सदर अतिरिक्त कार्यभाराचा आदेश आता संपुष्टात आणून तो कार्यभार श्रीमती सोनाली चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे गडचिरोली सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी आता चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे राहणार आहे. शासनाचे अपर सचिव द. व. खारके यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विविध विकासकामे, प्रशासकीय निर्णय आणि प्रलंबित बाबींवर या बदलाचा परिणाम होणार असल्याने या आदेशाकडे विशेष लक्ष लागले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker