ताज्या घडामोडीदेश विदेशसामाजीक

तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा तिसरा दिवस

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जाहीर पाठिंबा

तिवसा, प्रतिनिधी :-

वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, या मागणीसाठी तिवसा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा आणि मानवतावादी विचारांचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी सभापती सरदार विलासरावजी माहोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून पाठिंबा मिळत असल्याने या मागणीने आता व्यापक स्वरूप धारण केले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker